Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

चीनचा उल्लेख करत राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका; म्हणाले..

नवी दिल्ली : चीननं आपल्या नवीन नकाशात लडाख आणि अरूणाचलमधील काही भाग, अक्साई चीन आपल्या देशआत असल्याचं दाखवलं आहे. यामुळे देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी नुकताच आपला लडाख दौरा पुर्ण केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, मी तर कित्येक वर्षांपासून सांगतोय. मी आत्ता लडाखहून आलोय. पंतप्रधान इतक्या वर्षांपासून सांगतायत की लडाखमध्ये एक इंचही जमीन गेलेली नाही. पण हे साफ खोटं आहे. आख्ख्या लडाखला माहिती आहे की चीननं आपली जमीन अतिक्रमित केली आहे. नकाशाची बाब तर गंभीर आहे. पण त्यांनी आपली जमीनही घेऊन टाकली आहे. त्यामुळे यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीतरी बोलायला हवं.

हेही वाचा – ‘अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही एकत्र’; रामराजे निंबाळकर यांचं विधान

दरम्यान, चीननं आपल्या नवीन नकाशात लडाख आणि अरूणाचलमधील काही भाग, अक्साई चीन आपल्या देशआत असल्याचं दाखवलं आहे. तसेच तैवान व वादग्रस्त दक्षिण चीनी समुद्राचा हिस्साही आपल्या देशाला जोडला. त्यावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली असून चीनची ही कृती विचित्र असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button