‘जनसागराच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही’; सुनेत्रा पवार
पुणे | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या प्रचारासाठी राजगड तालुक्यातील वडगाव झांजेमध्ये पोहचल्या असता त्यांचा गावाच्या वेशीवरच प्रचंड उत्साहाने गावकऱ्यांनी स्वागत केले. गावच्या वेशीपासून सुमारे अर्धा किलोमीटर आत गावापर्यंत रांगोळ्यांच्या अंथरलेलया पायघड्या. गावातील तमाम ज्येष्ठ मंडळीनी तरूणांसह धरलेला लेझिमचा डाव, युवकांचे ढोल पथक आणि प्रत्येक घरातील माता भगिनींनी केलेले औक्षण अशा अफाट उत्साहात सुनेत्रा पवार यांचं स्वागत करण्यात आलं.
निर्धारपूर्वक प्रचंड मताधिक्याने विजयाची ग्वाही दिली. त्याबद्दल या साऱ्या साऱ्यांचे सुनेत्रा पवार यांनी मनापासून आभार मानले. संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची प्रचिती आजच्या राजगड तालुका दौऱ्यातही सुनेत्रा पवार यांना आली. जनसागराच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जनसंपर्कासोबत राज्य आणि केंद्र शासनाचा माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व शक्तीनिशी कटिबद्ध राहीन. हा माझा शब्द देखील यावेळी सुनेत्रा पवार यांनी गावकऱ्यांना दिला.
हेही वाचा – ‘भोसरीतून आढळराव पाटील यांना लाखाचे मताधिक्य देणार’; आमदार महेश लांडगे
या दौऱ्याची सांगता वडगाव झांजेमध्ये झाली ती अशा भक्कम, जल्लोषी, उत्स्फूर्त प्रतिसादाने झाली. राजगड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष दामगुडे यांनी प्रास्ताविकात देशहित जपत विकासाच्या पाठीशी सारा राजगड तालुका घड्याळाच्या पाठीशी एकवटल्याचे सांगितले.