पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांबरोबर किती आमदार होते? सुधीर मुनगंटीवार म्हणाले..
![Sudhir Mungantiwar said that Ajit Pawar is the main leader of NCP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Sudhir-Mungantiwar-780x470.jpg)
मुंबई : २०१९ मधील विधानसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपत घेतली होती. या घटनेबद्दल वारंवरा अनेक नेते वेगवेगळे दावे करत आहेत. दरम्यान भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आम्हाला सांगण्यात आलं होतं की, संपुर्ण राष्ट्रवादीचाच पाठिंबा आहे. या सरकारला पवारसाहेब (शरद पवार) मंजुरी देतील असा आमचा भाव होता. अजितदादा येतायत म्हणजे राष्ट्रवादीचाच या सरकारला पाठिंबा आहे असं वाटत होतं.
हेही वाचा- राज ठाकरेंच्या टीकेला भाजप नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले, घरात बसून..
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते आहेत. त्यामुळे ते या सरकारमध्ये येतायत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच आपल्या बरोबर आहे असं वाटतं होतं. आम्हाला वाटलेलं की, अजित पवार काकांशी (शरद पवार) बोलतील, मग आपण पुढे जाऊ. आम्ही अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय एक व्यक्ती म्हणून घेतला नव्हता, तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून केला होता, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.