Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘एसटी’ची सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नशील’; मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी असून ती अधिक गतिमान, सुरक्षित आणि आरामदायी करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याची ‘एसटी’ लवकरच नव्या रूपात जनतेसमोर येईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

राज्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. या सुविधेचा लाभ सुलभपणे घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरण मंत्रालयातील पत्रकार कक्षात करण्यात आले. यावेळी अभिनेते रितेश देशमुख, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार गिरीश देशमुख,  मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे तसेच पत्रकार उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘मित्रा’ आणि ‘बायसॅग-एन’ यांच्यातील करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना मिळणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते वरिष्ठ पत्रकारांना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की,  एसटीच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करण्यात येत असून, येत्या काही वर्षांत डिझेलवर चालणाऱ्या बस टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. यामुळे पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळेल. एसटी स्थानकांची स्वच्छता राखण्यासाठी खाजगी कंत्राटे देण्यात आली असून, दर चार तासांनी स्वच्छतागृहांची साफसफाई केली जाईल. बस स्थानकेही स्वच्छ व सुटसुटीत ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे लवकरच एसटीचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

एसटीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही जबाबदारी स्वीकारल्याबद्दल परिवहन मंत्री सरनाईक यांनी दोघांचे आभार मानले.

अभिनेता रितेश देशमुख यांनी सांगितले की, त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी परिवहन खाते सांभाळले होते. एसटी हा त्यांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण एसटीचे ब्रँड अॅम्बेसेडर होण्याचा निर्णय घेतला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button