Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मित्रा’ आणि ‘बायसॅग-एन’ यांच्यातील करारामुळे महाराष्ट्राच्या तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना मिळणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधा विकास, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘मित्रा’ आणि बायसॅग-एन यांच्यात झालेला सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वर्षा निवासस्थान येथे मित्रा MITRA (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉरमेशन) आणि बीआयएसएजी-एन (भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लीकेशन अँड जिओ-इन्फॉमेटिक्स) यांच्यात  सामंजस्य  करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, बायसॅग-एन महासंचालक डॉ. टी. पी. सिंह, ‘मित्रा’चे वरिष्ठ सल्लागार डॉ. विराज लोलियाना, संशोधन अधिकारी सुमेरन बालसेकर व अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  परभणीत पोलिस यंत्रणा अधिक गतिमान; ३१ वाहनांचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भू-स्थानिक माहितीचे व्यवस्थापन व विश्लेषण करण्यासाठी विविध स्रोतांमधून आणि विविध स्वरूपांतील माहिती संकलित करून तिचे सखोल विश्लेषण व निरीक्षण केले जाणार आहे. या माहितीच्या आधारे शासकीय योजना, विविध प्रकल्प आणि कार्यक्रमांचे संनियंत्रण व मूल्यमापन प्रभावीपणे करता येईल. तसेच वस्तुनिष्ठ व सखोल विश्लेषणाच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक समतोल राखत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत होईल.

कराराची वैशिष्ट्ये

-भू-स्थानिक क्षेत्रात धोरणे व मानक कार्यपद्धती विकसित करण्यासाठी  तांत्रिक सहाय्य करणे

-प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून भू-स्थानिक तंत्रज्ञान, दूरसंवेदी तंत्रज्ञान, उपग्रह संप्रेषण, जिओ-इन्फॉर्मेटिक्स आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देणे.

-बिग डेटा मॅपिंग, प्रगत फोटोग्रामेट्री, डिफरेंशियल जीपीएस आणि विषयनिहाय भू-स्थानिक मॉडेलिंगचा वापर करून अचूक नकाशांकन व स्थानिक विश्लेषण करणे.

-प्रकल्पांच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर प्रणालींचा विकास व सानुकूलन करण्यात येईल. यामध्ये उंची नमुना, पृष्ठभाग नमुना, अचूक ऑर्थो-फोटो निर्मिती आणि प्रगत कार्टोग्राफीचा समावेश

-बहुवर्णीय उपग्रह प्रतिमांच्या प्रक्रियेद्वारे प्राप्त माहितीचा उपयोग करून प्रकल्पांचे नियोजन, रचना आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी व्यापक डेटा उपलब्ध करून देणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button