पिंपरी-चिंचवडमध्ये संघटन मजबूत करा; शहराचे प्रश्न सोडवा!
राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्या सूचना; नवनियुक्त युवक पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन
![Pimpri-Chinchwad, Organization, Strengthen, City, Solve the problem, Nationalist, Youth Leader, Partha Pawar, Newly Appointed Youth, To office bearers, Guidance,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/aap-1-780x470.png)
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन मजबूत करा आणि शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्या, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस युवक सेलच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी शेखर काटे, कार्याध्यक्षपदी प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, प्रसन्न डांगे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी युवा नेते पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शहरातील विविध मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर आदी उपस्थित होते.
युवा नेते पार्थ पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि नवी जबाबदारीही आपण अतिशय समर्थपणे पार पाडाल, असा विश्र्वास दाखविला. पार्थ पवार आणि युवक पदाधिकाऱ्यांच्या भेटीत शहरातील आणि संघटनेतील विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. युवक संघटन, युवकांचे प्रश्न आदी मुद्दे यावरही चर्चा झाली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून शहराच्या दृष्टीने युवक संघटन मजबूत करण्याबाबत सूचना केल्या आहेत.