ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज्यात आज सर्वत्र पावसाचा इशारा

नऊ जिल्ह्यांना 4 ते 7 डिसेंबर दरम्यान येलो अलर्ट

महाराष्ट्र : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रात दिसण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. तसेच राज्यात वाढलेला गारठा कमी झाला आहे. सध्या मुंबई शहरासह उपनगरात सध्या रिमझिम पाऊस कोसळत आहे. तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, पालघर या ठिकाणीही पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात आज सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळाचा विपरीत परिणाम महाराष्ट्रात होत आहे. यामुळे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. मुंबईत आज ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळत आहे. विशेष म्हणजे मुंबईमध्ये थंडी असताना फेंगल चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा तापमानात वाढ झाली आहे.

अरबी समुद्रामध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता अधिक असल्याने मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आर्द्रतेतही वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांना 4 ते 7 डिसेंबर दरम्यान येलो अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट
रत्नागिरी – 5 डिसेंबर सिंधुदुर्ग – 5 आणि 6 डिसेंबर पुणे – 5 डिसेंबर कोल्हापूर – 5, 6, 7 डिसेंबर सातारा – 5 डिसेंबर लातूर – 5 डिसेंबर धाराशिव – 5 डिसेंबर

जालन्यात पावसामुळे फळबागांना फटका
तसेच जालना जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. जालन्यातील पिरकल्याण, वरूड, कडवंची या गावात सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान रिमझिम पाऊस पडला आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील तूर, हरभरा त्याचबरोबर उन्हाळी मक्का इत्यादी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर फळबागांना देखील या पावसाचा फटका बसला आहे.

वाशिममध्ये पावसाची सुरुवात, शेतकरी चिंतेत
त्यासोबतच गेल्या तीन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. यानंतर आज सकाळच्या सुमारास वाशिममध्ये अवकाळी पावसाचं आगमन झालं. रिसोड, मालेगाव आणि वाशिम तालुक्यातील काही भागात सध्या रिमझिम पाऊस सुरु आहे. यामुळे वातावरणात गारवा वाढला आहे. या पावसामुळे रब्बी पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचा जोर वाढल्यास तूर पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button