‘महाविकास आघाडीचे खासदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा’; जयंतराव पाटील
राष्ट्रवादी कामगार सेल,एन.टी.यु.एफ, असंघटित कामगार विभागाची राज्यव्यापी बैठक पुणे येथे संपन्न.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Untitled-design-40-780x470.jpg)
पुणे : महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुका लवकरच होत आहेत या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आणि कामगार,कष्टकरी, शेतकरी,असंघटित कामगार यांचे हिताचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी फुंकनारा माणूस व महाविकास आघाडीचे चिन्ह असलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी त्वरित कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले.
पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन,राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाची राज्यबैठक पुणे पक्ष कार्यालयात कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यव्यापी कामगार सेल, असंघटित कामगार विभागाचे बैठकीचे आयोजन करण्यात आली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ आप्पा शिंदे,असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, प्र.संघटक सुनील नलावडे,सोशल मीडिया प्रमुख अमोल गायकवाड,असंघटितचे सरचिटणीस शरद पंडित, निवृत्ती देसाई,सेक्रेटरी बजरंग चव्हाण, नितीन पाटील उपाध्यक्ष, उमेश शिंदे,दिलीप चव्हाण,सुरेश मोरे,मुनिर शेख,रयत चे सुदाम शिंदे, प्रभाकर रहाणे, गुरुदेव सरोदे दीपक थोरात, राजेंद्र लहामगे,राजेश माने, विनोद गवई यांचे सह मुंबई संभाजीनगर सातारा सांगली कोल्हापूर अकोला नागपूर अमरावती सह इतर जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दृकश्राव्य माध्यमातून सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत महाराष्ट्र राज्यामध्ये शरदचंद्र पवार साहेब आणि महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे, मात्र आपण अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे ते करावे असे आवाहन केले. तर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे आणि कामगार विभागाच्या पदाधिकाऱ्यानी शिरूर व बारामती लोकसभा यासह आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडण्यासाठी अधिक प्रचार करावा .
हेही वाचा – काय घडलं की उद्धव ठाकरेंची साथ सोडली? रवींद्र वायकर पक्षप्रवेशावेळी म्हणाले…
प्रदेशाध्यक्ष खटकाळे म्हणाले की काळ संकटाचा असला तरी शरदचंद्र पवार यांचे कार्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आता रडायचं नाही आपल्याला लढायचे आहे. कामगार शक्तितून महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा विजय घडवायचा आहे, अच्छे दिन तर आलेच नाहीत, राज्यभरात चाललेली फोडाफोडी जनतेला पटलेली नसून सामान्य जनता पवार साहेब यांच्या सोबत आहे.राज्यातील कामगारांनी आप आपल्या जिल्ह्यात काम सुरू करावे ,मार्गदर्शन लागल्यास आम्ही आहोत.
शिंदे म्हणाले की तळेगाव येथील जनरल मोटर्सच्या एक हजार कुटुंबावरती सरकारने अन्याय केला आणि त्यांना बेरोजगार केले अशीच स्थिती सर्व कंपन्यांमध्ये सुरू आहे. माथाडी, कामगार कायदा रद्द करण्याच्यामागे सरकार लागलेले आहे, मात्र जन आंदोलन उभारल्यानंतर तात्पुरते रोखले आहे, जनतेमध्ये जाऊन भाजपच्या चुकीच्या कामाचा आढावा आपल्याला नागरिकासमोर मांडावा.
असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नखाते म्हणाले की वेदांता फॉक्स्वान, टाटा एअरबस, बल्क ड्रग पार्क सारखे प्रकल्प गुजरातला नेऊन महाराष्ट्राचे महत्त्व कमी करून महाराष्ट्राला बेरोजगार करण्याचे काम भाजप सरकारने केलेला आहे महाराष्ट्र राज्यातील असंघटित कामगार असुरक्षित असून भाजप सरकार हे कामगार आणि कष्टकरी विरोधी आहे हे कामगारावरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे.
प्रस्ताविक पुणे शहराध्यक्ष नितिन पाटिल, तर सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रवीण बल्लाळ तर आभार अमोल गायकवाड यांनी मानले.