राज्य सरकारचा मोठा निर्णय! प्रतिज्ञापत्राची ५०० रुपयांची स्टॅम ड्युटी माफ

मुंबई | राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता शासकीय कामांसाठी नागरिकांना प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा : महिला दिनानिमित्त सक्षमा प्रकल्पांच्या महिलांसाठी मेळावा
विविध शासकीय प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. या प्रतिज्ञापत्रासाठी नागरिकांना ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागत होते. त्याचा फटका विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसत होता.
उत्पन्नाचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्रासह इतर अनेक प्रमाणपत्रासाठी ५०० रुपये प्रत्येकी लागत होते. म्हणजेच केवळ मुद्रांक शुल्कापोटीच विद्यार्थ्यांना वर्षाला २ हजारांहून अधिकचा खर्च येत होता. पण आता हा खर्च वाचणार आहे.