ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

जागा वाटपावर मंथन सुरू,संजय राऊतांचे पवारांना प्रत्युत्तर

शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती,केंद्रावर साधला निशाणा

बारामती : विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावर मंथन सुरू आहे. तर एका जागेवर तीनही पक्षांनी दावेदारी केल्याने त्याठिकाणी चर्चेअंती निर्णय होणार आहे. पण काल श्रीगोंद्यात बोलताना संजय राऊत यांनी पुढचा आमदार ठाकरे गटाचाच राहिल असे वक्तव्य चर्चेत आले होते. त्यावर शरद पवार यांनी बारामतीत प्रतिक्रिया दिली. उमेदवाराची अशी घोषणा करणे चुकीचे असल्याचे पवार म्हणाले. त्यावर आता शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती, संजय राऊत यांचं पवारांना पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्रावर साधला निशाणा
निरीक्षक मुंबईत येत आहेत. विधानसभेच्या निवडणुका कधी घ्यायचा विचार करत आहेत. झारखंड आणि हरियणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका घ्यायला हव्या होत्या. एक देश एक निवडणुका घेणार होते. त्यांना चार राज्यांच्या एकत्रित निवडणुका घेता येत नाही. आता निरीक्षक येतील पडद्या आड चर्चा होतील, असे ते म्हणाले.

पवार यांच्याकडे चुकीची माहिती
शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे. पवारांकडे श्रीगोंदाबाबत चुकीची माहिती आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना काम करण्यासाठी संदेश देत असतो. २८८ मतदारसंघात आपली तयारी आहे. कागलला सचिन घाडगे आहेत. अनेक मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना आदेश देतात तयारी करतात. श्रीगोंद्यात काय घडतं माहीत नाही. पण महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकणार आहे. कुणीही कोणती तयारी केली नाही. पण आम्ही कार्यकर्त्यांना तयारीला लागा, कामाला लागा, पुढे व्हा असा संदेश दिला तर चुकीचं नाही. हेच संदेश पवार आणि नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिला असेल तर त्यात चुकीचं नाही, असे म्हणाले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button