Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

एकनाथ शिंदेंची काही खाती इतर मंत्र्यांकडे; काय आहे कारण?

Eknath Shinde : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळापुरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जवळील काही खाती तूर्तास शिवसेना पक्षातील इतर मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरुपात देण्यासंबंधी पत्र जारी केले आहे.

त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा दादा भुसे यांच्याकडे, गृहनिर्माण खात्याची धुरा शंभुराज देसाई यांच्याकडे, तर नगरविकास मंत्रालयाची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

हेही वाचा –   राज्यातील ‘या’ ६ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी

शिंदे यांनी यासंबंधीचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवले आहे. अधिवेशनाच्या काळात या खात्यांसंबधी विरोधीपक्षांकडून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आता जबाबदारी मिळालेले मंत्री देणार आहेत. दरम्यान, राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या अभिभाषणाने आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button