कोणत्या समलिंगी पुरूषांना मासिक पाळी येते? स्मृती इराणींचं नवं विधान चर्चेत
![Smriti Irani said which gay men get periods](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Smriti-Irani-780x470.jpg)
मुंबई : केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाठी स्वच्छता धोरणाच्या मसुद्दामध्ये LGBTQIA+ समुदाय देखील समाविष्ट असेल का? या प्रशनाला उत्तर देत केलेले विधान आता नव्याने चर्चेत आले आहे.
आरजेडीचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत चर्चेदरम्यान LGBTQIA+ समुदायामध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेचा प्रचार आणि सुविधांचा पुरवठा करण्यासाठी तरचुदी आहेत का? असा प्रश्न विचारला होता. यावर, कोणत्या समलिंगी पुरूषाला, गर्भाशयाशिवाय, मासिक पाळी येते? असं स्मृती इराणी म्हणाल्या.
हेही वाचा – काँग्रेसची जाहीरनामा समिती जाहीर! ‘या’ १६ नेत्यांचा समावेश; पाहा संपूर्ण यादी
EP-123| Smriti Irani on Parliament Security Breach, I.N.D.I.A Bloc, Menstrual Leave Debate, T.V world#ANIPodcastwithSmitaPrakash #SmritiIrani #parliamentwintersession
Premiering now: https://t.co/txiyGx0NEy
— ANI (@ANI) December 21, 2023
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत स्मृती इराणी म्हणाल्या, मनोज कुमार झा यांचा प्रश्न, एकतर धोरणाला विरोध करण्यासाठी देण्यासाठी, भडकवण्यासाठी किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी होता. त्यांची इच्छा आहे की ‘मी (LGBTQIA समुदायाच्या) मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी कशी तरतूद करू करते’ याबद्दल उत्तर द्यावे. पण समलिंगी पुरुषांसाठी हे मुळातच लागू होतं का? असा सवाल केला.
दरम्यान, यापूर्वी १३ डिसेंबर रोजी संसदेच्या चर्चेदरम्यान, केंद्रीय मंत्र्याने महिला कर्मचार्यांना मासिक पाळीच्या अनिवार्य रजेच्या कल्पनेला विरोध केला होता. राज्यसभेत बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही. त्यासाठी भरपगारी सुट्टीच्या कोणत्याही विशिष्ट धोरणाची हमी देऊ नये असे स्मृती इराणी यांनी म्हटले होते.