‘मासिक पाळी हे अपंगत्व नाही, त्यासाठी..’; स्मृती इराणी यांचं विधान चर्चेत
![Smriti Irani said that menstruation is not a disability](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Smriti-Irani--780x470.jpg)
नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी राज्यसभेत बोलताना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी महिलांच्या मासिक पाळीबाबत मोठं विधान केलं आहे. मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही, त्यासाठी भरपगारी सुट्टीच्या कोणत्याही विशिष्ट धोरणाची हमी देऊ नये, असे इराणी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सदस्य मनोज कुमार झा यांनी देशातील मासिक पाळी स्वच्छता धोरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना इराणी राज्यसभेत बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, एक मासिक पाळी येणारी स्त्री म्हणून मी सांगू शकते की, मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही, हा स्त्रियांच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. ज्यांना मासिक पाळी येत नाही अशा व्यक्तीचा मासिक पाळीबद्दल विशिष्ट दृष्टिकोन असतो, फक्त म्हणूनच स्त्रियांना समान संधी नाकारल्या जातात अशा समस्या आपण मांडू नयेत.
हेही वाचा – खासदार सुप्रिया सुळेंना दुसऱ्यांदा ‘संसद महारत्न पुरस्कार’
“Menstruation is not a handicap”
Here are Smriti Irani’s remarks on mentruation leave policy in response to a question by RJD MP Manoj Jha on this issueListen in! #SmritiIrani #BJP #MinistryOfWomenAndChildDevelopment #Menstruation #PaidLeave pic.twitter.com/bzHYu1wgzc
— Moneycontrol (@moneycontrolcom) December 14, 2023
अगदी काहीच महिला/मुली गंभीर डिसमेनोरिया किंवा तत्सम तक्रारींनी ग्रस्त आहेत, आणि यापैकी बहुतेक प्रकरणे औषधोपचाराने नियंत्रित करता येतात. मासिक पाळीचा मुद्दा आणि त्याच्याशी संबंधित उपक्रम हे अनेकदा शांततेच होतात कारण याविषयी भाष्य करणे, हे आपल्या समाजात निषिद्ध मानले जाते व याभोवती एक संकोच, लाजेचा वेढा असतो. मासिक पाळी येणाऱ्या महिलेचं अगदी साध्या कामातील स्वातंत्र्य सुद्धा यामुळे कमी होतं ज्याचा दुरगामी परिणाम त्यांच्यावरील सामाजिक बहिष्कार व अत्याचार या स्वरूपात दिसून येऊ शकतो. जेव्हा एखाद्या महिलेला किंवा मुलीला आपल्या शारीरिक व मानसिक बदलांविषयी समजून घ्यायला वेळ लागत असतो तेव्हा तर हा मुद्दा आणखीनच संवेदनशील ठरू शकतो, असंही स्मृती इराणी म्हणाल्या.