ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लाडक्या बहिणीांना 2100 रुपये या महिन्यानंतर मिळणार

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केले

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली महायुतीच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही अतिशय चर्चेत असून जुलै महिन्यात या योजनेची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातीस महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. तसेच पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरन 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिले होते. आत्तापर्यंत कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून त्याचा फायदा महायुतीलाही विधानसभेत झाला. लाडक्या बहीणींनी भरभरून मतदान केल्याने महायुती पुन्हा सत्तेत आली. मात्र आता आश्वासनाची पूर्तता कधी होणार, लाडक्या बहिणीांना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न अनेकींच्या मनात होतात. त्याच संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. मार्च महिन्यानंतरच लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये होणार. अर्थ संकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात विखे पाटील यांनी हे विधान केलं. एकीकडे विरोधक हे लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. तस विधानसभा निवडणुकीत जे आश्वासन मिळालं त्याची पूर्तता कधी होणार, 2100 रुपये कधीपासून खात्यात जमा होणार याची राज्यातील महिलांना उत्सुकता होती. आता त्याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्च महिन्यानंतर हे पैसे मिळतील असे विधान केले असून त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 2100 रुपये कधी जमा होतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

जुलै महिन्यात घोषणा
जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात महायुती सरकारने, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केली होती. राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेसाठी जवळपास अडीच कोटी महिलांनी अर्ज केले. त्यानंतर जुलैपासून या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यास सुरुवात झाली. तसेच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोंबर अन् नोव्हेंबर महिन्याचे पैसे, एकूण 3 हजार रुपये एकत्रित देण्यात आले होते.

लाडकी बहीण ठरली गेमचेंजर
या योजनेचा कोट्यावधी महिलांनी लाभ घेतला. आणि महायुतीसाठी देखील ही योजना गेमचेंजर ठरली. महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. महायुतीचे 230 जागांवर उमेदवार निवडून आले. भाजपला प्रथमच 132 जागा मिळाल्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 जागांवर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 41 जागांवर विजय मिळाला. विदानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी केले होते. त्यामुळेच 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयेच मिळाला. आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशानंतर, मार्च महिन्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढून 2100 होईल असे विधान केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button