TOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेराजकारणव्यापार

अजित पवारांना धक्का : हवेली बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सुपडा साप’

अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा १३-२ असा एकतर्फी विजय : आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात विजयी सलामी

पुणे । विशेष प्रतिनिधी
हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निवडणुकीत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या कट्टर समर्थकांचा पराभव झाला. जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रदीप कंद आणि विकास दांगट यांच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने १३-२ असा विजय मिळवला आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली बाजार समितीचा हा निकाल अजित पवार यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे.

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात उरतले होते. त्यापैकी १५ जागांवर आमने-सामने लढत झाली. २ जागा व्यापारी आणि आडते मतदार संघातून व १ जागा हमाल-मापाडी मतदार संघातून निवडून आली आहे. तब्बल २० वर्षांनंतर ही निवडणूक झाली. तसेच, राष्ट्रवादीतून विकास दांगट यांनी बंडखोरी केली. त्यांच्यावर पक्षाने हकालपट्टीची कारवाई केली. त्यामुळे या निवडणुकीत प्रचंड चूरस निर्माण झाली होती. तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे खंदे समर्थक आणि महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. दुसरे उमेदवार तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांचाही पराभव राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर पॅनल आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी यामध्ये लढत झाली. ७२.२९ टक्के इतके मतदान झाले होता. स्वारगेट येथील शिवशंकर सभागृह येथे मतमोजणी करण्यात आली. सेवा सहकारी संस्था गटातील ११ जागा, ग्रामपंचायात गटात ४, व्यापारी व आडते गटात २ आणि हमाल, मापाडी गटातील १ जागेसाठी उमेदवार निवडणूक लढले.

पिंपरी-चिंचवडकरांनी राष्ट्रवादीला नाकारले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारात उडी घेतली होती. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील सेवा सहकारी मतदार संघातील सुमारे १३१ मतदारांनी राष्ट्रवादीला नाकारल्याचे दिसून येत आहे. भाजपा पुरस्कृत पॅनलसाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रचार केला. रावेत, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, चोविसवाडी, निरगुडी आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी-गाठी केल्या. त्याचा फायदा अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांना झाला. आमदार लांडगे यांनी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष भेटी दिल्या. भाजपा पुरस्कृत उमेदवारांच्या विजयासाठी सक्रीय पुढाकार घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सेवा सहकारी संस्था मतदार संघामध्ये अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा दबदबा कायम राहिला.


विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :

सेवा सहकारी संस्था मतदार संघ :
१- रोहिदास उंद्रे
२- नितीन दांगट
३- प्रकाश जगताप
४- प्रशांत काळभोर
५- राजाराम कांचन
६- दत्तात्रय पायगुडे
७- दिलीप काळभोर

सेवा सहकारी संस्था महिला राखीव :
८- मनिषा हरपळे
९- सारिका हरगुडे

सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्ग :
१०- शशिकांत गायकवाड

सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती/ भटक्या जमाती:
११- लक्ष्मण केसकर

ग्रामपंचायत सदस्य सर्वसाधारण :
१२- रामकृष्ण सातव
१३- सुदर्शन चौधरी

व्यापारी आडते मतदार संघ :
१४- गणेश घुले
१५- अनिरुद्ध भोसले

ग्रामपंचायत सदस्य आर्थिकदृष्या दुर्बल घटक :
१६- रविंद्र कंद

ग्रामपंचायत सदस्य अनुसूचित जाती/ जमाती :
१७- नानासाहेब आबनावे

हमाल-मापाडी मतदार संघ :
१८- संतोष नांगरे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button