TOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

लोणावळ्यात अजित पवारांना धक्का : ‘‘बाप बाप असतो..’’ म्हणत कार्यकर्ते शरद पवार गटात परतले!

आम्हाला संविधान वाचवायचा आहे; म्हणून तुतारी फुंकणार आहे!

पुणे : मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अजित पवारांना शरद पवार आज धक्का देत आहेत. अजित पवारांचे लोणावळ्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार सोबत येणार आहेत. ‘‘बाप बाप असतो, आमचा बाप दहा दादा तयार करू शकतात. पण ते दादांना शक्य होणार आहे का? , ’’ असं म्हणत अजित पवारांच्या समर्थकांनी शरद पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोणवळ्यात अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

कार्यकर्ते म्हणाले की, बाप बाप असतो, आमचा बाप दहा दादा तयार करू शकतात. पण ते दादांना शक्य होणार आहे का? ,मुळात दादा जनतेचा नव्हे तर स्वतःचा विकास करायला गेलेत. मात्र आम्हाला संविधान वाचवायचा आहे. यासाठी आम्ही शरद पवारांची तुतारी फुंकतो,. असं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, २०१४ नंतर देशाच्या संविधानाला कमकुवत करण्याचं काम सुरु आहे. महागाई, बेरोजगारी वाढली आहे. त्यातच देशाचा आणि राज्याचा एक विचार तोडण्याचं काम सध्या राज्याच दिसत आहे. राज्यातली पुरोगामी संस्कृती तोडून, राज्याला तोडून, पक्ष मोडून अनेकांची घरं उद्वस्त करण्याची कामं सुरु आहे. शरद पवार हे लोकशाही टीकवणारे आणि रोजगार देणारे नेते आहेत. अजित पवार फक्त खुर्ची वाचवण्यासाठी भाजपसोबत गेले असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

हेही वाचा – मविआच्या जागावाटपाबाबत संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला; म्हणाले..

जुलैपासून हे सगळे कार्यकर्ते अजित पवार गटात होते. मात्र या कार्यकर्त्यांनी आता अजित पवारांना रामराम करत शरद पवारांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बोलताना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अजित पवारांच्या अनेक गोष्टी आम्हाला खटकल्या आहेत. ज्या भाजपबरोबर एवढे वर्ष विरोधात लढलो. आज त्यांच्याबरोबरच काम करायचं हे न पटण्यासारखं आहे. आम्ही सगळेच शरद पवारांच्या विचारांशी सहमत आहोत आणि आम्हीच त्यांचा वारसा पुढे नेणार आहोत.

अजित पवारांना धक्का!

या कार्यकर्त्यांचा शरद पवारांना पाठिंबा देणं हा अजित पवारांना लोणावळ्यात मोठा धक्का मानला जात आहे. त्यासोबतच येत्या काही दिवसांत लोकसभेच्या निवडणुका येत आहे. त्यामुळे जर कार्यकर्ते नाराज असतील आणि शरद पवारांना पाठिंबा देण्याची तयारी दाखवत असतील तर यामुळे अजित पवारांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button