breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

शिवसेना नेत्या, अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध; ‘या’ व्यक्तीचा दावा

दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान बँक खाते असल्याचा दावा

Dipali Sayyed : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा दावा त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्याशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

भाऊसाहेब शिंदे म्हणाले की, दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे. इतकच नाही तर दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान बँक खाते असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांच्या संबंधांविषयी भाजपच्या दिग्गज नेत्यांना माहिती आहे. मात्र हितसंबंधांमुळे दीपाली सय्यद यांना पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नाही. दीपाली सय्यद यांच्यावर कारवाई झाली नाही तर आगामी काळात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही भाऊसाहेब शिंदे यांनी दिला आहे.

यापुर्वीही भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांच्याबाबत अनेक दावे केले आहेत. दीपाली सय्यद यांनी अनेकांना कोट्यावधींचा गंडा घातल्याचा आरोप त्यांचेच माजी स्वीय साहय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता. लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा दाखवला आणि कोट्यवधी रूपये लाटल्याचा आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला होता. दीपाली सय्यद यांचं पाकिस्तान-दुबई कनेक्शन आहे, असंही भाऊसाहेब शिंदे यांनी म्हटलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button