Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

शरद पवारांची पुन्हा एकदा विरोधकांच्या विरोधात भूमिका; म्हणाले..

मोदींच्या डिग्री वादावर शरद पवारांनी मांडले आपले मत

मुंबई : हिंडनबर्ग अहवाल, त्यावर विरोधकांची जेपीसीची मागणी याबाबत शरद पवार यांनी शंका उपस्थित करत विरोधी पक्षांच्या उलट भूमिका मांडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान शरद पवारांनी दुसऱ्यांदा विरोधकांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे.

शरद पवार म्हणाले की, आज महाविद्यालयीन पदवीचा प्रश्न पुन्हा विचारला जात आहे. तुमच्याकडे कोणती पदवी आहे. माझ्याकडे कोणती पदवी आहे. पण हा राजकीय मुद्दा आहे का? बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था, महागाई किंवा अन्य महत्वाच्या प्रश्नांवर केंद्र सरकारला घेरले पाहिजे.

धर्म आणि जातीच्या आधारावर लोकांमध्ये दुरावा निर्माण केला जात आहे. महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके नष्ट केली आहेत. अशा विषयांवर चर्चा करायला हवी, असे मत शरद पवार यांनी मांडले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button