ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोरांची ‘फिल्डींग’

नवी दिल्ली: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठकांच्या मालिकेने चांगलीच चर्चा रंगली. या बैठकीच्या मालिकेनंतर प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली. दरम्यान, या सलगपणे होत असलेल्या बैठकांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांना पुढील राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर रणनीती आखत असल्याची चर्चा आहे.

 

पश्चिम बंगालमधील रणसंग्राम पार पडल्यानंतर प्रशांत किशोर आणि शरद पवार तीनदा भेटले आहेत. यामधील एक बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांमधील नेत्यांच्या उपस्थितीत झाली आहे. ही बैठक भाजपविरोधात आगामी विधानसभा आणि २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या एकजुटीसाठी झाली असल्याचेही बोलले जात आहे.

 

तथापि या सर्व शक्यता प्रशांत किशोर यांनी फेटाळून लावल्या आहेत. त्यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास नसल्याचे म्हटले होते. मात्र, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांची एकजूट करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button