breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

संजय राऊतांच्या टीकेला शंभुराजे आणि शिवेंद्राराजेंचं प्रत्युत्तर

सातारा : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती घराण्यातील तीन राजांसह शंभुराजे देसाई यांच्यावर टीका केली होती. राऊतांच्या या टीकेला शिवेंद्रराजे भोसले आणि शंभुराजे देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

खासदार संजय राऊतांच्या टीकेवरून आमदार शिवेंद्रराजे म्हणाले की, छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही?, असा सवाल शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला आहे. संजय पवार यांना तिकीट देवून शिवसेनेने जखमेवर मीठ चोलण्याचे काम केले. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीकाही शिवेंद्रराजे यांनी केली आहे.

राऊतांच्या टीकेवरून शंभुराजे देसाई म्हणाले की, संजय राऊतांच्या डोक्यावर १०० टक्के परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते निवडणूक आयोग आणि न्याय व्यवस्थेवर टीका करत आहेत. आता ते माझ्यावर टीका करत आहेत. मी ३ टर्म आमदारकीला निवडून आलो आहे. मी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर पाटणमध्ये शिवसेना वाढली. जो आमच्या मतदारसंघ हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा बालेकिल्ला होता. येथे तीन वेळा शिवसेना आमदार निवडून आणला. जे संजय राऊत कधी ग्रामपंचायतला निवडून आले नाहीत त्यांनी आमच्यावर टीका करू नये, अशी टीका केली.

दरम्यान, तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात. त्या घराण्यातील आहात. त्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण तुम्ही ज्या पक्षात आहात, त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर आणि प्रेम नाही. हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत. पुर्वी चत्रपती पेशव्यांना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी छत्रपती घराण्यातील राजांवर केली होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button