TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, आरोपींविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
![Pune railway station, sex racket, busted, against the accused, in Bundagarden police station, case registered,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Sex-Racket-780x470.png)
पुणे । पुणे रेल्वे स्थानक परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ग्राहकाच्या रुपात एका पोलिस कर्मचाऱ्याला पाठवले. त्यानंतर कर्मचारी या जाळ्यात अडकताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
तसेच पोलिसांनी कारवाईदरम्यान ४ मुलींना ताब्यात घेतले आहे. या मुलींची सुटका करून त्यांना महंमदवाडी येथील पुनर्वसन केंद्रात नेण्यात आले. तर आरोपींविरोधात कलम ३७०, ३४ आणि अनैतिक तस्करी प्रतिबंधक कायद्याच्या (पीआयटीए) कलमांनुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.