breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

काँग्रेसला मोठा धक्का! मुंबईतील मोठे नेते बाबा सिद्दीकींचा राजीनामा

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपुर्वी मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते अजित पवार गटात जाणार अशी चर्चा होती.

बाबा सिद्दीकी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, मी तरुणपणात काँग्रेस पक्षात सामील झालो आणि हा ४८ वर्षांचा महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला व्यक्त व्हायला खूप काही आवडले असते पण ते म्हणतात ना काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या..या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो.

हेही वाचा    –    पंकजा मुंडे राज्यसभेत जाणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..

कोण आहेत बाबा सिद्दीकी?

बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्वाचे नेते आहेत. महाविद्यालयात शिकत असतानाच बााब सिद्दीकींचा १९७७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विद्यार्थी दशेत अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांचं मुंबईच्या एमएमके महाविद्यालयात शिक्षण झालं. ते १९९९,२००४ आणि २००९ मध्ये सलग तीनवेळ आमदार म्हणून निवडूण आले. त्यांच्यावर राज्यमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. मुंबईतील काँग्रेसमधील मास लीडर म्हणून बाबा सिद्दीकींची ओळख आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button