स्व. अण्णासाहेबांचे माथाडी कामगारांसाठीचे कार्य दीपस्तंभासारखे: इरफानभाई सय्यद…
![self Annasaheb's head, workers, work like a lamppost, Irfanbhai Syed,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/irfan-sayyad-1-780x470.jpg)
पिंपरी : स्व.अण्णासाहेब पाटील यांनी लाखो कष्टकरी, माथाडी, मापाडी कामगारांना सन्मानाने जगता यावे, यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अण्णासाहेब पाटील यांनी गोरगरीब, कष्टकरी, माथाडी कामगारांसाठी केलेलं कार्य हे एका दीपस्तंभासारखे आहे. माथाडी कामगारांच्या कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक जीवनातील अण्णासाहेबांचे कार्य नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी असेल, असे प्रतिपादन कामगार नेते तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांनी केले.
स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंचवड येथील त्यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते इरफानभाई सय्यद बोलत होते.
कार्यक्रमास संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, खंडू गवळी,संदीप मधुरे ,पांडुरंग काळोखे, प्रमोदमामा शेलार, संतोष साळुंखे सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, सतीश कंठाळे, गोरक्षनाथ दुबाले, बबन काळे,मारुती कौदरे, अशोक साळुंखे, समर्थ नाइकवाडे, सुनिल सावळे, ज्ञानेश्वर घनवट, गिरीश देशमुख, चंद्रकांत पिंगट,अमृत शिंदे,बालाजी खैरे,अविनाश जांभळे ,सोमनाथ फुगे, सोपान गाडगे, सतीश शिंदे, माउली पाचपुते, उद्धव सरोदे, शंकर मदने ,बाबाजी पोटे, शंकर शिंदे, तानाजी कोळेकर, कैलास तोडकर, चंदन वाघमारे, अनिल खपके, साईनाथ धोत्रे, रत्नाकर भोजने असंख्य कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
पुढे बोलताना इरफानभाई म्हणाले, पाटण तालुक्यातील मुंदुळ कोळे या गावी जन्मलेल्या अण्णासाहेबांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबई शहर गाठले. मुंबईत आल्यावर उसाच्या चरक्यावर आपल्या कष्टकरी जीवनाला त्यांनी प्रारंभ केला. दारुखाणा येथे ओझे उचलण्याची कामे त्यांनी केली. ही कामे करत असताना कामगारांना मिळणारा मोबदला, मालकाकडून होणारी पिळवणूक पाहून त्यांचे मन तळमळत असे. त्या तळमळीतून माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी लढा सुरु केला. पुढे अनेक राजकीय नेत्यांकडे, सरकार दरबारी पत्रव्यवहार, पाठपुरावा करून माथाडी कायदा अमलात आणला. त्यांच्या योगदानामुळेच आज कामगारांचे बलाढ्य संघटन सर्वत्र उभे आहे.