Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महापौरपदाची सोडत जाहीर! महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांचे आरक्षण पाहा..

मुंबई | महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर आता सत्तास्थापनेचे गणित आणि महापौरपदाची सोडत हे राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी अनेक महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेसाठी सहकारी किंवा विरोधी पक्षातील काही गटांचा पाठिंबा घेण्याची वेळ आली आहे. तर राज्यात सत्तेत एकत्र असलेले पक्ष स्थानिक पातळीवर एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्रही दिसून आले.

या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये सत्तास्थापनेबाबत राजकीय नाट्य रंगले असतानाच महापौरपदाच्या आरक्षणाची सोडतही चर्चेचा विषय ठरली होती. अखेर ही सोडत जाहीर करण्यात आली असून, कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

२९ महानगरपालिकांमधील आरक्षणाचे गणित

अनुसूचित जमाती (एसटी) – १

अनुसूचित जाती (एससी) – ३

ओबीसी – ८

सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) – १७

याशिवाय, २९ पैकी तब्बल १५ महानगरपालिकांमध्ये महिलांसाठी महापौरपद आरक्षित असणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महिला नेतृत्वाला संधी मिळणार आहे.

हेही वाचा     :          To The Point: भाजपामधून NCP मध्ये गेले अन्‌ सपाटून आपटले!

महानगरपालिका – महापौरपदाचे आरक्षण

  • कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती
  • ठाणे – अनुसूचित जाती
  • जालना – अनुसूचित जाती (महिला)
  • लातूर – अनुसूचित जाती (महिला)
  • इचलकरंजी – ओबीसी
  • पनवेल – ओबीसी
  • अहिल्यानगर – ओबीसी (महिला)
  • अकोला – ओबीसी (महिला)
  • उल्हासनगर – ओबीसी
  • कोल्हापूर – ओबीसी
  • चंद्रपूर – ओबीसी (महिला)
  • जळगाव – ओबीसी (महिला)
  • मुंबई महानगरपालिका – खुला प्रवर्ग
  • पुणे महानगरपालिका – खुला प्रवर्ग
  • छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग (महिला)
  • धुळे – खुला प्रवर्ग (महिला)
  • अमरावती – खुला प्रवर्ग (महिला)
  • भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग
  • मालेगाव – खुला प्रवर्ग
  • मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग
  • नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)
  • नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला)
  • पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग
  • नाशिक – खुला प्रवर्ग
  • नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)
  • परभणी – खुला प्रवर्ग
  • सांगली-मिरज – खुला प्रवर्ग
  • वसई-विरार – खुला प्रवर्ग
  • सोलापूर – खुला प्रवर्ग

महापौरपदाच्या या आरक्षणामुळे अनेक ठिकाणी सत्तास्थापनेचे समीकरण बदलण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत महानगरपालिकांच्या राजकारणात आणखी चढ-उतार पाहायला मिळणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button