Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न..!’ बिहार निवडणुकींवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एडीएला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. भाजपा, जद(यू) आणि लोजप (रामविलास) हे पक्ष एकत्रितपणे १९१ जागांवर आघाडीवर आहेत. तर महागठबंधनला सपशेल अपयश मिळताना दिसत आहे. सुरुवातीच्या या निकालांवर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही, निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न..! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले!

हेही वाचा      :            “बिहारचा विजय आपलाच, आता बंगालची वेळ”; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान   

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button