भारत-पाकिस्तान पुन्हा आमने सामने; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहणार सामना!

Asia Cup Rising Stars Cup 2025 | एशिया कप रायजिंग स्टार्स २०२५ स्पर्धेला आजपासून (१४ नोव्हेंबर) दोहा येथे सुरूवात होत आहे. या स्पर्धेत ८ संघ जेतेपदासाठी झुंज देताना दिसून येणार आहेत. ज्यात भारत, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान अ आणि पाकिस्तानसह ओमान, हाँगकाँग आणि यूएई या संघांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेत भारतीय अ संघाचे नेतृत्व स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मा करणार आहे.
गटवाटप
अ गट: अफगाणिस्तान अ, बांगलादेश अ, श्रीलंका अ, हाँगकाँग
ब गट: भारत अ, पाकिस्तान अ, ओमान, यूएई
हे सामने लाईव्ह कुठे पाहता येणार?
एशिया कप रायजिंग स्टार्स २०२५ स्पर्धेतील सामने वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम दोहा येथे खेळवले जाणार आहेत. भारताचा यूएईविरूद्ध होणारा सामना हा संध्याकाळी ५ वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि ओमानविरूद्ध होणारा सामना हा रात्री ८ वाजता खेळवला जाणार आहे. हे सामने तुम्ही सोनी स्पोर्ट टेन १ आणि टेन १ एचडी या चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता. यासह या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमींग तुम्ही सोनी लिव अॅपवर पाहू शकता.
हेही वाचा : ‘एकदम महाराष्ट्र पॅटर्न..!’ बिहार निवडणुकींवर संजय राऊतांची प्रतिक्रिया




