‘नवीन इंजेक्शन घेतल्यामुळेच नवाब मलिक सुटले’; संजय राऊत
![Sanjay Raut said that Nawab Malik escaped only because of taking a new injection](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Sanjay-Raut-1-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल १७ महिन्यानंतर नवाब मलिक तुरूंगातून सुटणार आहेत. एक दोन दिवसांत त्यांना सोडलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खादरास संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, नवाब मलिक सुटले याचा आनंद आहे. मलिक यांना मोकळा श्वास घेता येईल याचा आनंद व्यक्त करतो. एका मंत्र्याला 16 महिने तुरुंगात ठेवले जाते. त्याची ट्रायल सुरू नाही. हा कोणता कायदा आहे? आपल्या राजकीय विरोधकांचा असा छळ ज्या कायद्याने केला जात आहे, तो देशद्रोहापेक्षा डेंजर आहे, असं सांगतानाच नवीन इंजेक्शन घेतल्यामुळेच नवाब मलिक सुटले.
हेही वाचा – ‘नरेंद्र मोदी हे देशाला धोकादायक, त्यांना..’; प्रकाश आंबेडकर यांचे विधान
काल म्हणे केंद्राने देशद्रोहाचा कायदा रद्द केला. ब्रिटिश कालीन कायदा रद्द केला. त्या देशद्रोहाच्या कायद्याला मागे टाकणारे कायदे वापरून तुम्ही राजकीय विरोधकांना गुंतवत आहात, अडकवत आहात. राजकीयदृष्ट्या ज्यांचा भविष्यात त्रास होईल अशा अनेक राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकत आहात. त्यामुळे देशद्रोहाचा कायदा रद्द केला त्याचं काय कौतुक सांगता? ब्रिटिशांच्याहीपेक्षा भयंकर कायदे तुम्ही निर्माण केले आहेत. ते राजकीय विरोधकांविरोधात वापरत आहात, असं संजय राऊत म्हणाले.
मलिक १६ महिन्यानंतर सुटले. पण जे तुरुंगाच्या वाटेवर होते, त्यांना अशाच प्रकारच्या कायद्याने सोडलं आहे. जे चाललं आहे ते देश हुकूमशाहीकडे चालल्याचं लक्षण आहे. देशद्रोहाचा कायदा रद्द केल्याची टिमकी वाजवू नका. ब्रिटिशांपेक्षाही भयंकर कायद्याचा वापर तुम्ही राजकीय विरोधकांच्यासाठी करत आहात. तो देशद्रोहाच्यावर आहे, असंही संजय राऊत म्हणाले.