‘कंगना रणौतला राष्ट्रपती भवनात ठेवावं’; संजय राऊत यांचा टोला

मुंबई | अभिनेत्री कंगना रणौत खासदार बनून दिल्लीमध्ये गेल्यावर तिने महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री कक्षाची मागणी केली. यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी कंगणा रणौतवर जोरदार टीका केली आहे. कंगना रणौत हिमाचल प्रदेशमधून निवडून आली असल्याने तिच्या राहण्याची सोय हिमाचल भवनमध्ये करण्यात यावी, असं ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी महाराष्ट्र सदनातील मुख्यंमत्री कक्ष मागितला. त्यांची ही मागणी मुर्खपणाची आहे. नवीन खासदारांची त्या त्या राज्यातील सदनात व्यवस्था केली जाते. नियमाप्रमाणे त्यांची व्यवस्था हिमाचल प्रदेशच्या सदनात व्हायला हवी. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचा कक्ष मागणे मुर्खपणाचे आहे. त्यांना तर राष्ट्रपती भवनात ठेवायला हवं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
हेही वाचा – अफगाणिस्तानची बांगलादेशवर विजय मिळवत सेमीफायनलमध्ये एन्ट्री, ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट
https://x.com/rautsanjay61/status/1805259100575682837
संजय राऊत यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी एक्स मिडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे की, बापरे! श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी. हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळत असेल तर काहीच हरकत नाही. महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहात आहेत श्रीमतीजी.





