Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘काँग्रेस, राष्ट्रवादीला बाळासाहेबांवर जास्त प्रेम’; संजय राऊतांचं विधान

Sanjay Raut | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारसभा सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करायला सांगावं असं अमित शाह म्हणाले. यावरून खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, की राज्यात विधानसभेची निवडणूक होतेय. अशात कोण किती जागा जिंकणार? याची चर्चा रंगलेली आहे. महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? याची संख्या संजय राऊत यांनी सांगितली आहे. महाविकास आघाडीला १० जागा मिळणार नाही असं सांगत होते. ३१ जागा जिंकलो. सर्व्हे होता नरेंद्र मोदी ४०० पार. पण बहुमत मिळालं नाही. आता महायुतीचे लोकं कुठून सर्व्हे करतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील. यांचा भरवसा नाही. पण मी सांगतो महाविकास विकास आघाडीला १६० ते १६५ जागा मिळतील.

हेही वाचा     –      देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी! 

बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय भाजपा एक इंच पुढे जाऊ शकत नाही. तोच पक्ष भाजपाने फोडला, खरेदी केला आणि एकनाथ शिंदेंना विकला. तुमच्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीला बाळासाहेब ठाकरेंबाबत जास्त प्रेम आणि आदर आहे. त्यांचं प्रेम तुमच्यासारखं ढोंगी नाही पाठीत खंजीर खुपसणारं, असं संजय राऊत म्हणाले.

वीर सावरकरांना भारतरत्न द्या, हे आम्ही दहा वर्षांपासून सांगतो आहे. का देत नाहीत भाजपाचे लोक? वीर सावरकरांना भारतरत्न देणं हे अमित शाह यांच्या हातात आहे. ते का देत नाहीत? बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात आम्हाला कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या बॅनर आणि पोस्टरवरचा फोटो काढा. तुम्हाला महाराष्ट्रात कुणी उभंही करणार नाही. अमित शाह खोटं बोलत आहेत, व्यापारी खोटं बोलतो. दुकानदार आपल्या फायद्यासाठी खोटं बोलतो किंवा भेसळ करतो, असा टोलाही अमित शाह यांना संजय राऊत यांनी लगावला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button