‘राज ठाकरेंना बाळासाहेब माफ करणार नाहीत’; संजय राऊतांची टीका

मुंबई | शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना, शिवसैनिक, धनुष्यबाण ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह कोण आहेत? त्याच मोदी-शाहांची तळी राज ठाकरे आज उचलत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे जे बोलत आहेत, तीच बाब आम्ही दोन वर्षांपासून सांगत आहोत. शिवसेना, शिवसैनिक, धनुष्यबाण ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी-शाह कोण आहेत? त्याच मोदी-शाहांची तळी राज ठाकरे आज उचलत आहेत. राज ठाकरेंचा हल्ला मोदी-शाहांवर असायला हवा.
शिवसेना कुणाची प्रॉपर्टी हे ठरविण्यासाठी राज ठाकरेंना आम्ही लवाद म्हणून नेमलेले नाही. शिवसेना शिंदेंची प्रॉपर्टी नाही, तशी ती मोदी-शाहांचीही नाही. बाळासाहेब हयात असताना त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हाती सुपूर्द केली होती. शरद पवार हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या हाती देण्यात आला. राज ठाकरे हा मूळ मुद्दा बाजूला ठेवून बोलत आहेत. त्यांना महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री करायचा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षाचे नाव आणि निशाणी घेतली. अजित पवारांनीही पक्षाचे नाव घेतले, निशाणी घेतली. आता शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे आणि नाही उद्धव ठाकरेंची. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसे हात लावता? तुम्हाला काय ते आमदार फोडाफोडीचे राजकारण करा. माझे कितीही मतभेद असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे शरद पवारांचे अपत्य आहे. ते अजित पवारांचं अपत्य नाही. महाराष्ट्राची वैचारिक किती घसरण व्हावी? पक्ष पळवतात, निशाणीच्या निशाणी पळवतात. माणसं पळवली जातात. ज्या महाराष्ट्राकडे सुस्कृंत महाराष्ट्र म्हणून पाहिले जायचे, देशाला दिशा देणारे राज्य म्हणून पाहिलं जायचं, त्या महाराष्ट्राची ही अवस्था. अशा गोष्टी उत्तर प्रदेश-बिहारमध्ये होतात. महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश बिहार करायचे आहे का आम्हाला? असं राज ठाकरे म्हणाले.





