नागपुर, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे या सर्व महापालिकांचेही ऑडिट करा; संजय राऊतांची मागणी
![Sanjay Raut said that all municipalities like Nagpur, Pune, Pimpri-Chinchwad, Thane should also be audited](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Sanjay-Raut-1-3-780x470.jpg)
मुंबई : मुंबई महापालिकेचे ऑडिट होणार असेल तर नागपुर, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे या सर्व महापालिकांचेही ऑडिट करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका काही राष्ट्रीय स्वरूपाची नसते. दोन दिवसांपूर्वी पंडित नेहरूंवर अमित शहा यांनी टीका केली, या देशात लोकशाही, संविधान आहे. सेन्सरशिप लावली नाही. राजकीय भूमिका घेऊन कोणी टीका करत असेत आणि त्यावर एखाद्या पक्षाचे लोक गुन्हे दाखल करून अटकाव करण्याचा प्रयत्न करत असेल तर या लोकांना आम्ही आणीबाणीविरूद्ध लढा दिला, असा डंका पिटण्याचा अधिकार नाही.
दिशा सालीयानप्रकरणी एसआयटी स्थापन करायची असेल, तपास सीआयडीकडे द्यायचा असेल तर द्या, आमची काही हरकत नाही. राजकीय विरोधकांच्या संदर्भात खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची हा सत्तापक्षाचा धंदा झाला आहे. हा बदनामी करण्याचा कारखाना आहे, पण आम्ही त्यांना भीक घालत नाही, त्यांना एसआयटी चौकशी करायची असेल तर खुशाल करा, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – राजू शेट्टींनी केंद्र सरकारला धारेवर धरलं; म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी..
Nagpur, Maharashtra: Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut on a case registered against him for objectionable writeup against PM in 'Saamana'; says, "We have respect for PM Narendra Modi…Amit Shah made remarks on Former PM Jawaharlal Nehru a few days earlier, will a case get… pic.twitter.com/hfYGIwsRR5
— ANI (@ANI) December 12, 2023
मुंबई महापालिकेचे ऑडिट होणार असेल तर नक्कीच करा, सोबतच नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे या सर्व महापालिकांचेही ऑडिट करा. शिवाय नगर विकास विभागाच्या गेल्या दीड वर्षांतील कारभाराचे आणि व्यवहाराचेही ऑडिट करा, असं संजय राऊत म्हणाले.
मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांवर दबाव येत होता. आधी सदस्यांनी राजीनामे दिले, आता मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांवर दबाव येत होता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, असेही राऊत म्हणाले. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला आमच्या पक्षाकडून कोणीतरी उपस्थित राहतील. शरद पवार यांचा वाढदिवस आहे, त्यांना उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्व नेते शुभेच्छा देणार आहोत, असंही संजय राऊत म्हणाले.