‘मणिपूर, हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रातही दंगली घडवणयाचा प्रयत्न सुरू’; संजय राऊतांचा गंभीर आरोप
![Sanjay Raut said that after Manipur, Haryana, Maharashtra is also trying to create riots](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Sanjay-Raut--780x470.jpg)
मुंबई : मणिपूरमधील हिंसाचारावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मणिपूर, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या सीमांवर दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक, भाजपाचं गुरूजी मंडळ तणाव निर्माण करत आहे. महाराष्ट्रात दंगलींची आग भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, ती अशा विचारांना बळी पडणार नाही. या लोकांनी (राज्य सरकार) गुंडांना, भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घातलं आहे. हे फडणवीस ज्यांना (अजित पावर) तुरूगांत पाठवणार होते, चक्की पिसिंगबद्दल बोलत होते, ते आता तुमचे मंत्रिमंडळातले सहकारी झाले आहेत. ते तुमच्या खिशात आहेत, ह्रद्यात आहेत.
हेही वाचा – ‘औरंगजेबाच्या दोन राण्या काशीच्या पंड्यांनी भ्रष्ट केल्या’; भालचंद्र नेमाडे यांचं विधान चर्चेत
महात्मा गांधी, महात्मा फुले, संत साईबाबा ही महाराष्ट्राची श्रद्धास्थानं आहेत. महाराष्ट्र घडवण्यात यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याविषयी एखादी व्यक्ती असं काही बोलत असेल तर त्याच्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे. ते तुमचे गुरूजी असतील तर ठीक आहे, तुम्ही तुमच्या गुरूजींची पूजा करत बसा, असं संजय राऊत म्हणाले.