जय शाहने कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारलेत का? संजय राऊतांचा शाहांना खोचक टोला
![Sanjay Raut asked if Jai Shah hit more sixes than Kohli](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Sanjay-Raut-7-780x470.jpg)
मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. इंडिया आघाडीमध्ये घराणेशाही आहे हा अमित शाहांचा आरोप हास्यास्पद आहे. घराणेशाही तर भाजपानेच पोसली असल्याचं ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, अमित शाह इंडिया आघाडीत घराणेशाही म्हणत असतील तर त्यांचं वक्तव्य हास्यास्पद आहे. घराणेशाही इंडिया आघाडीत नाही तर भाजपात आहे. जय शाहने विराट कोहलीपेक्षा जास्त सिक्सर्स मारले आहेत का? सचिनपेक्षा जास्त शतकं ठोकली आहेत का? की त्यांना बीसीसीआयचं अध्यक्ष केलं? अमित शाह गृहमंत्री नसते तर जय शाह हे बीसीसीआयमध्ये असते का? घराणेशाही म्हटलं जातं तेव्हा घराण्याची प्रतिष्ठा आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा १६ हप्ता आज जमा होणार
ठाकरे घराण्याला प्रतिष्ठा आहे. या प्रतिष्ठेचा फायदा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही झाला आहे. आम्ही स्वार्थाचं राजकारण करत नाही. शरद पवारांची घराणेशाही आहे का? त्यांनी कृषी क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम केलं आहे त्याचा गौरव तुमच्या सरकारने केला आहे. घराणेशाही जर कुणी वाढवली असेल तर तो भाजपा आहे. ज्याला कुटुंब असतो तो घराणेशाहीच्या गोष्टी बोलतात, असंही संजय राऊत म्हणाले.