मुख्यमंत्री शाळांमध्ये जाऊन पहारा देणार आहेत का? महिला अत्याचाराच्या घटनांवर बोलताना शिंदे गटाच्या नेत्याचं विधान
![Sanjay Gaikwad said whether the Chief Minister is going to go to all the schools in the state and guard them](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Eknath-Shinde-1-2-780x470.jpg)
मुंबई | काही दिवसांपूर्वीच बदलापूरच्या एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचा केल्याची घटना उघडकीस आली होती. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. राज्य सरकार कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलं असून आरोपींना कायद्याचा धाक उरला नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. दरम्यान, विरोधकांच्या आरोपांवर आता शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी भाष्य केलं आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असतात, मग आता काय मुख्यमंत्री राज्यातील शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
आमदार संजय गायकवाड म्हणाले, बदलापूरची घटना दुर्दैवी आहे. हा गुन्हा करणारी एक विकृती आहे. पण विरोधक या घटनेवरून राजकारण करत आहेत. विरोधातले सगळे पक्ष या मुद्द्यावरून थयथयाट करत आहेत. या घटनेला सरकारला जबाबदार धरत आहेत. पण आता काय मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये जाऊन पहारा देणार आहेत का? की पोलीस अधिक्षक त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत? आरोपी गुन्हा करण्यापूर्वी पोलिसांना फोन करून सांगतो का?
हेही वाचा – पुण्यात तरूणीची हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन धड नदीपात्रात फेकलं
मुळात अशा प्रकाराच्या घटना घडत असतात, त्या हाताळ्यासाठी एक व्यवस्था असते, राज्यात पोलीस यंत्रणा आहे. पोलिसांकडून असे प्रकरणं हाताळल्या जात नसेल तर ती सीबीआयकडे सोपवली जातात. पण आरोपीला सोडलं जात नाही. पण अशा घटनांचं राजकारण करण्यापेक्षा नराधमांना शिक्षा कशी मिळेल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. पण असे प्रयत्न होताना दिसत नाही. विरोधक कुठलीही घटना घडली की त्याचं राजकारण करतात, असा आरोपही संजय गायकवाड यांनी केला.