अजित पवार यांच्यानंतर जयंत पाटील सत्तेत येणार? शिंदे गटातील नेत्याचा दावा
![Sandeepan Bhumre said that Jayant Patil can come to us](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/jayant-patil-and-sharad-pawar-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल भेट झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. त्यामुळे जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडून सत्तेत सहभागी होतील अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते संदीपान भुमरे यांनी मोठा दावा केला आहे.
संदीपान भुमरे म्हणाले की, अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे बातम्यांच्या माध्यमातून कळलं. पण ते घरगुती कारणासाठी भेटले असतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. तर जयंत पाटील हे सत्तेत सहभागी होणार का या प्रश्नावर त्यांनी, जयंत पाटील आमच्याकडे येऊ शकतात. अजित पवार आले तर जयंत पाटील ही येऊ शकतात. आले तर त्यांचं स्वागत आहे, जयंत पाटील आले म्हणजे शरद पवार आल्यासारखेच आहे.
हेही वाचा – ‘राज्यात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प’; उदय सामंत यांची माहिती
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपचा विरोध नव्हता. उद्धव ठाकरेंनी स्वत: सांगितलं होतं की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं. असंही बोललं जातं की, शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायला लावलं. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास भाजपचा विरोध नव्हता. आता त्यांनीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे. संजय राऊत यांना काही काम नाही त्यामुळे ते असं बोलत आहेत, असंही संदीपान भुमरे म्हणाले.