औरंगजेबच्या मुद्द्यावरून संभाजीराजे यांचा संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले..

मुंबई : MIM पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेतील औरंगाजेबच्या घोषणा दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे राज्यातील राजकारण सध्या चांगलच तापलं आहे. दरम्यान, यावरून संभाजीराजे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे म्हणाले की, कसं काय कुणी औरंगाजेबचं नाव घेऊ शकतं? छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्या माणसाने त्रास दिला. छत्रपती संभाजीराजे यांची ज्याने हत्या केली. त्याचं कुणी कसं कौतुक करू शकतं? असा संतप्त सवाल संभाजीराजे यांनी केला आहे.
हेही वाचा – भारतीय संघाचा भावी कर्णधार कोण? सुनील गावस्करांनी घेतले ‘या’ खेळाडूचे नाव
प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाजेबच्या कबरीची पाहणी केली. तिथे माथा टेकला. त्यावरून संभाजीराजे यांनी सल्ला दिलाय. हे दुर्दैवी आहे. हे काही महाराष्ट्राचे संस्कार नाही. तुम्हाला जर अभिवादन करायचं असेल, तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला जाऊन अभिवादन करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन अभिवादन केलं होतं, असं संभाजीराजे म्हणाले.
भावी मुख्यमंत्री म्हणत संभाजीराजे यांच्या नावाचा बॅनर लावण्यात आला. त्यावर संभाजीराजे म्हणाले, मी काही हे पोस्टर लावलेले नाहीत. माझ्या मनात काही नाही. फक्त प्रामाणिकपणे काम करत राहणं हे माझं ध्येय आहे. ते मी करतो आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.





