breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भाजपला मोठा धक्का! कोल्हापूरचे नेते समरजीत घाटगे राशपच्या वाटेवर?

Samarjit Ghatge | कोल्हापूरमधील भाजपते नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे भाजपला राम राम ठोकून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मंगळवारी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. ३ सप्टेंबर रोजी शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना घाटगे यांचा पक्षप्रवेश होईल, असे बोलले जाते.

२०१९ च्या विधानसभेच्या मागील निवडणुकीत ‘कागल’मध्ये तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, शिवसेनेकडून संजय घाटगे तर अपक्ष म्हणून समरजित घाटगे रिंगणात उतरले होते. यावेळी समरजीत घाटगे यांनी ८८ हजार मते घेतली होती. त्यानंतर ते थेट भाजपमध्ये सक्रिय झाले होते. विधानसभेसाठी त्यांनी तयारीही सुरु केली. मात्र महायुतीच्या जागावाटपात कागलची जागा हसन मुश्रीफ यांनाच मिळण्याचे संकेत अजित पवारांनी दिले होते. कागल मध्ये कार्यक्रमात हसन मुश्रीफ हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. त्यामुळे राजकीय भवितव्यसाठी समरजीत घाटगे हे पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जातंय.

हेही वाचा     –      २१ ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’ची हाक; जाणून घ्या काय सुरू, काय बंद?

दरम्यान, सुप्रिया सुळे यांना समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, मला याबाबत माहिती नाही. समरजित यांच्याबाबतची ही माहिती मी तुमच्याचकडून ऐकतेय. पण समरजित घाटगे यांना मी अनेक वर्षांपासून ओळखते. अतिशय कर्तृत्ववान नेतृत्व आहे. जीवनात त्यांनी संघर्ष केलेला आहे. अर्थातच महाराष्ट्रासाठी ते काही करू पाहत असतील, तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागतच केलं पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button