ब्रिजभूषण शरण सिंह यांची नर्को टेस्ट करावी; कुस्तीपटूंनी केली मागणी
![Sakshi Malik said that Narco test should be done on Brijbhushan Sharan Singh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/sakshi-malik-and-brijbhushan-sharan-singh-780x470.jpg)
दिल्ली : कुस्तीपटूंचे दिल्लीतील जंतरमंतरवर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात धरणे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, कुस्तीपटू साक्षी मलिक हिने खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना आव्हान देत त्यांची लाइव्ह डिटेक्टर नार्को चाचणी करावी अशी मागणी केली आहे.
साक्षी मलिक म्हणाली की, मी WFI अध्यक्षांना नार्को टेस्ट करण्याचे आव्हान देते. आम्हीही चौकशी करण्यात तयार आहोत. दोषी कोण आणि कोण नाही हे सत्य बाहेर येऊ द्या.
हेही वाचा – उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? घटनातज्ञ उल्लास बापट याचं मोठं विधान
२०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा बजरंग पुनिया म्हणाला की, सर्व स्पर्धा आयओएच्या एड-हॉक पॅनेलच्या अंतर्गत व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. जर ब्रिजभूषण कोणत्याही प्रकारे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतील तर आम्ही त्याला विरोध करू.