ताज्या घडामोडीपुणेराजकारण

संत सेवालाल महाराज बंजारा /लमाण तांडा समृद्धी योजना सदस्य समितीवर प्रेम किसन राठोड यांची निवड

ॲड.पंडित भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात सामाजिक,साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची घेतली दखल

पुणे : नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा /लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्याच्या समितीवर सदस्य म्हणून प्रेम किसन राठोड यांची निवड करण्यात आली आहे.ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील रहिवासी असून धर्मगुरू महंत जितेंद्र जी महाराज यांच्या आशीर्वादाने तथा 12 धाम तीर्थक्षेत्राचे निर्माते गोर हृदय सम्राट धर्मनेता भगवंत सेवक किसनभाऊ राठोड यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या सामाजिक क्षेत्रातील देशव्यापी समाज हिताची उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत.राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.विलासभाऊ राठोड, राष्ट्रीय महासचिव ॲड.पंडित भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात सामाजिक,साहित्यिक व शैक्षणिक या क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेऊन सदर नियुक्ती करण्यात आली आहे.

बंजारा व लमाण समाजाच्या विकासासाठी तांड्यांना स्वयंपूर्ण बनवून मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची तरतूद करण्यात आली आहे.प्रत्येक तांड्याला विकास निधींचा योग्य विनियोग व्हायला हवा या उदात्त हेतूने 29 जिल्ह्यातून प्रत्येकी दोन सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक 80 प्रतिशत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे हे विशेष , मा.किसन भाऊ राठोड यांनी चलो गोर राजसत्ता की ओर अशा प्रकारचा नारा देऊन समाजातील राजकीय इच्छाशक्ती असणाऱ्या तरुण-तरुणी जेष्ठ श्रेष्ठ लोकांना एक प्रकारची मौलिक संधी दिली आहे. आणि यापुढेही समाज बांधवांना राजसत्ता धर्मसत्ता शैक्षणिक सत्ता मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतात. असे पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त सदस्य प्रेम किसन राठोड यांनी प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले आहे.

यावेळी त्यांना मा.किसन भाऊ राठोड ,मा.विलास भाऊ राठोड, मा.ॲड.पंडित भाऊ राठोड, यवतमाळ जिल्हा पतसंस्थेचे विभागीय अध्यक्ष मा. राजूदासजी जाधव, धर्म रक्षक मा. नवनाथ चव्हाण, राष्ट्रीय युवा अध्यक्ष मा.श्रीमंत राजे चव्हाण,धर्मवीर मा प्रकाश भाऊ राठोड, राष्ट्रीय प्रवक्ता मा.मधुकर जी जाठोत, प्रदेश प्रवक्ता मा.अमोलभाऊ पवार,प्रदेश प्रवक्ता मा.मिथुन भाऊ राठोड,राज्य संघटक मा.रावसाहेब चव्हाण,मा.बबनराव मुंडवाईक सर,मा.सुरेश पवार सर,मा.सुरेश राठोड सर,मा. विश्वंभर उपाध्ये, मा. गजानन ठाकरे,मा.विठ्ठल विरुळकर,मा.भास्कर डहाके आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तसेच राष्ट्रीय बंजारा परिषद तथा समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून प्रत्येक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ‌

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button