‘क्टार्टरच्या किंमती एवढे पैसे एक लिटर दुधाला द्या’; सदाभाऊ खोत यांची अजब मागणी
पुणे : २२ मे रोजी पुण्यामध्ये दुध प्रश्नावर रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून यात्रा काढण्यात आली होती. त्यावरून दुग्धविकास मंत्रालयाने बैठक बोलवली आहे. अशातच आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एक लिटर दुधाला देशी दारूच्या बाटलीच्या किंमती एवढा भाव द्या अशी अजब मागणी केली आहे.
देशी दारूच्या बाटलीची किंमत जेवढी आहे तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या अशी मागणी केली आहे अशी माहीती माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयतक्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला आणि या दरम्यान सदाभाऊ खोत बोलत होते.
हेही वाचा – निरा स्नानानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन
गाईच्या दुधाला प्रति लिटरला ७५ रुपये भाव मिळाला पाहिजे. तर म्हशीच्या दुधाला सव्वाशे रुपये प्रति लिटरला भाव मिळाला पाहिजे. ही भाववाढ देणं अवघड नाही. त्यामुळे महागाई वगैरे काही वाढत नाही. उलट शेतकऱ्याला जर भाव मिळाला तर महागाई निश्चितपणे कमी होईल. कारण महागाईची ज्यांना झळ पोहचते ती माणसं शेतीवरती काम करायला येतात. शेतकरी मग त्यांना दोन पैसे देतो, असंही सदाभाऊ खोत यावेळी बोलताना म्हणाले आहेत.