तू कुठं काय केलंस? अजित पवार गटाचा सुप्रिया सुळेंना खोचक टोला
![Rupali Chakankar said that in Baramati Lok Sabha Constituency, only those whose lives are elected are asked questions](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Supriya-Sule-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका सुरू झाली आहे. सुनील तटकरेंसह राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही एक कविता पोस्ट करून सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
रूपाली चाकणकर म्हणाल्या, तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जीवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न..? दादासमोर नाक उचलून धाकुटी विचारे तू कुठं काय केलंस? चंदनाच्या खोडाला सहाण विचारे तू कुठं काय केलंस? तो झिजला, पण विझला नाही देहाची कुडीच विचारे तू कुठं काय केलंस? पाया भरला, विटा-वासे तोलून धरले घराचा उंबराच विचारे तू कुठं काय केलंस? नांगर धरला, शेती केली भुईला भीमेचं भान दिलं मुसक्यांची गाठ विचारे तू कुठं काय केलंस? घामाला दाम दिला कष्टाला मान दिला रक्ताचं पाणीच विचारे तू कुठं काय केलंस? अशी कविता पोस्ट करत रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.
हेही वाचा – राज्यात पुढील ३-४ दिवसांत पावसाची शक्यता, कुठे यलो तर कुठे ऑरेंज अलर्ट
तीन टर्म बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्या जिवावर निवडून येतात त्यांनाच विचारतात प्रश्न…?
दादासमोर नाक उचलून
धाकुटी विचारे
तू कुठं काय केलंस?चंदनाच्या खोडाला
सहाण विचारे
तू कुठं काय केलंस?तो झिजला, पण विझला नाही
देहाची कुडीच विचारे
तू कुठं काय केलंस?पाया भरला,…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 25, 2023
दरम्यान, अजित पवारांनी ३० वर्षे बारामती शहर उभे केले. दादा…दादा…दादा म्हणत ज्यांचं राजकीय आयुष्य गेलं. मग, अजित पवारांविरोधात याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचं सुचलं. श्रीनिवास पाटलांबद्दल मला आदर आहे. पण, राजकीय लढाईत वयोमर्यादा हा विषय नाही, असं सुनील तटकरे म्हटलं आहे.