‘तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य उभं केलं’; रोहित पवारांची अजितदादांवर खोचक टीका
![Rohit Pawar said that through which dam did you irrigate and build an empire?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Rohit-Pawar-780x470.jpg)
मुंबई | राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर ईडीने कारवाई करून ५० कोटींची मालमत्ता जप्त केली. या कारवाईनंतर आमदार रोहित पवार यांनी एक्स एकाऊंटवरून काका अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका ‘बच्चा’ने ८०० कि.मी. ची पायी संघर्षयात्रा काढली त्यावेळी ‘यांनी काय संघर्ष केला’ अशी टीका काहींनी केली. त्यांना सांगायचंय की, बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या ‘मित्रा’बरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे. पण तुम्ही कोणता संघर्ष करुन आणि कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्याच आहे का? असा सवाल उपस्थित केला.
हेही वाचा – ..तेव्हा सर्वात आधी गडकरींचं नाव असेल; देवेंद्र फडणवीसांचं महत्वाचं विधान
युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका ‘बच्चा’ने ८०० कि.मी. ची पायी संघर्षयात्रा काढली त्यावेळी ‘यांनी काय संघर्ष केला’ अशी टीका काहींनी केली. त्यांना सांगायचंय की, बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या ‘मित्रा’बरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 9, 2024
माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची झलक आत्ताच जागावाटपातही दिसायला लागलीय. हव्या त्या मंत्रीपदासाठी आणि तिकीटासाठी तुम्ही शंभर दिल्लीवाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.