‘श्रीकांत शिंदे यांचा पत्ता कट होणार’; रोहित पवारांचा मोठा दावा
![Rohit Pawar said that Shrikant Shinde's address will be cut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Shrikant-Shinde-and-Rohit-Pawar-780x470.jpg)
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपानं बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे यांचा पत्ता कट होणार, असा मोठा दावा केला आहे.
रोहित पवार म्हणाले, यावरून समजून जायचं की भाजपाच्या मनात काय आहे. भाजपा नेहमी लोकनेत्यांना संपवतं. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर यांना राजकीय दृष्टीकोणातून संपवलेलं सर्वांनी पाहिलं आहे. अन्य पक्षातून घेतलेले लोकनेतेही संपले आहेत. एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या लोकांचंही महत्व कमी केलं जाईल.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेसाठी ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे
भाजपा आणि शिवसेना शिंदे गट युती आहे. मग श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपानं बैठका, सर्वे आणि चाचपणी घेण्याचं कारण काय? भाजपाला फक्त त्यांचं चिन्ह आणि पक्ष समजतो. बाकी कोणतेही नेते आणि लोकांचं प्रश्न समजत नाहीत, असं रोहित पवार म्हणाले.
बरोबर गेलेले सर्व नेते भाजपाच्या चिन्हावर लढतील. तर, रवींद्र चव्हाण यांना कदाचित कल्याणमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते, असंही रोहित पवार म्हणाले.