Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

राहुल कलाटे अहंकारी, २० हजारपेक्षा कमी मते पडणार; रोहीत पवार यांचा हल्लाबोल

नाना काटे हे प्रचंड मतांनी विजयी होतील

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनामुळे होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी चे आमदार रोहित पवार यांनी बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर निशाणा साधला आहे.चिंचवडमधील महाविकास आघाडी चे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ ते शुक्रवारी आले होते. राहुल कलाटे यांना २० हजारांपेक्षा कमी मते पडतील, असा दावाही रोहीत पवार यांनी केला आहे.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हे अहंकाराची भाषा बोलत आहेत. त्यांना वीस हजार मते पडतील. नागरिक अहंकार स्वीकारत नाहीत. तसेच नाना काटे हे प्रचंड मतांनी विजयी होतील. जगताप कुटुंबाबद्दल नागरिकांमध्ये सहानुभूती आहे.

पण, भाजपाला आम्ही मत देणार नाही उलट राष्ट्रवादीला निवडून आणणार असल्याचे वातावरण नागरिकांमध्ये आहे. अजित पवार यांनी केलेला विकास हे नागरिक विसरले नाहीत.पुढे ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष हे काहीही बोलले तरी खरे होणार आहे का? उलट राष्ट्रवादी चा उमेदवार निवडून येईल आणि प्रदेशाध्यक्ष यांना झटका बसेल.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button