‘मला अजितदादांसारखं व्हायचं नाही’; रोहित पवार यांचं अजित पवार गटाला प्रत्युत्तर

मुंबई : कितीही जन्म घेतले तरीही रोहित पवार हे अजित पवार होऊ शकणार नाही, असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणाले. दरम्यान, यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला अजितदादांसारखं व्हायचं नाही, असं रोहित पवार म्हणाले. मी राजकारणात आलोय ते नेता बनण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी, असा टोलाही लगावला.
रोहित पवार म्हणाले, तीन महिन्यापूर्वी जेव्हा पवार साहेबांना तुमच्या बरोबर किती आमदार आणि खासदार आहेत हा प्रश्न विचारला होता. त्यावेळी साहेबांनी सांगितलं होतं की माझ्याबरोबर शून्य आमदार आणि खासदार आहेत. म्हणजेच आदरणीय पवार साहेबांना महाराष्ट्राचे नागरिक महत्त्वाचे आहेत, कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत, पदाधिकारी महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनता नवीन चेहरे निवडून देतील असा विश्वास आदरणीय पवार साहेबांना आहे.
हेही वाचा – आरतीच्या वेळी टाळ्या वाजवण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे?
रोहित पवार महाविकास आघाडीत असताना भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते, असं अजित पवार गटाचे नेते सुनील शेळकेंनी म्हटलं आहे. यावरून रोहित पवार म्हणाले, आमच्या त्या भागातले जिल्ह्याचे प्रवक्ते जे असतील ते त्याला उत्तर देतील. मी माझा वेळ येथे वाया घालवणार नाही.





