Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘महापुरूषांचा अवमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही’; रोहित पवारांची टीका

मुंबई : महाराष्ट्र सदन येथे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मात्र यावेळी महाराष्ट्र सदनामध्ये दोन महापुरूषांचा अवमान करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

हेही वाचा – न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे #chocklate_boy आता गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत दाखवतील का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button