Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

रेखा गुप्ता होणार दिल्लीच्या मुख्यमंत्री, कोण आहेत रेखा गुप्ता?

Rekha Gupta | दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची मोठी चर्चा होती. अखेर बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवत पक्षाचा २७ वर्षांचा वनवास संपवला आहे. ७० जागांच्या विधानसभेत भाजपने ४८ जागा जिंकल्या, तर आम आदमी पक्षाने २२ जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसला पुन्हा एकदा दिल्लीत खाते उघडता आले नाही.

रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला आहे.

हेही वाचा  :  राज्यातले गडकिल्ले मंदिरांसारखेच पुजनीय, किल्ल्यांच्या संवर्धनसाठी अतिक्रमणं हटवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सक्रिय सदस्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदद्वारे विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला होता. १९९४-९५ मध्ये त्या दौलत राम कॉलेजच्या सचिव म्हणून निवडून आल्या होत्या. १९९५-९६ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या सचिव झाल्या. पुढे त्यांनी १९९६-९७ मध्ये दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपदही मिळवले होते.

२०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता शालीमार बाग मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. २०१५ मध्ये त्यांचा सुमारे ११००० मतांनी पराभव झाला होता तर २०२० मध्ये त्यांचा पराभवाचे अंतर ३४४० मते इतके होते. दोन्ही वेळी त्यांच्यावर वंदना कुमारी यांनी विजय मिळवला होता. पण यावेळी रेखा गुप्ता यांनी निवडणुकीत वंदना कुमारी यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button