Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज ठाकरेंसोबत ‘आघाडी’ ला नकार ; मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेस ठाम?

Congress On MNS Alliance : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रत्येक पक्षा या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. काही पक्ष युती करण्याची तयारी करत आहे तर काही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. यातच राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसेसोबत जाणार नाही. महाराष्ट्र काँग्रेस याबाबत लवकरच दिल्ली हायकमांडला माहिती देणार आहे. टिळक भवन येथे काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेण्यात  आला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे मात्र याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तर दुसरीकडे मुंबई महापालिका स्वबळावर जर लढलो तर जास्त जागा काँग्रेस लढू शकतो अशी देखील चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तर महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष सोबत आघाडी होऊ शकते अशी शक्यता आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

हेही वाचा –  उत्सव आनंदाचा खेळ पैठणीचा! महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान

मनसे प्रमुख राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीसोबत दिसत असून मतदार यादीवरुन भाजपसह निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करत आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु होती मात्र आता काँग्रेस या निवडणुकांसाठी मनसेसोबत आघाडी करणार नाही असं सांगण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आयोजित टिळक भवन येथील बैठकीत काँग्रेसने मनसेसोबत न जाण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाबाबत दिल्ली हायकमांडला माहिती देणार असं देखील सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मनसेसोबत आघाडी करणार असल्याची चर्चा जोराने सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी याबाबत संकेत देखील दिल्याने दोन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button