ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

सेवेशी तत्पर… अखंड निरंतर : पिंपळे निलखमधील तुषार कामठे यांचे भावनिक पत्र!

मिशन- PCMC : महापालिका प्रभाग क्रमांक 26 मधून निवडणुकीच्या रिंगणात

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आपल्या प्रभागातील मतदार बंधू-भगिनींना भावनिक पत्र लिहून पुन्हा एकदा विश्वास व पाठबळ देण्याचे आवाहन केले आहे.

पिंपळे निलख, विशालनगर व कसपटेवस्ती या प्रभागाचे माजी नगरसेवक असलेल्या तुषार कामठे यांनी गेल्या पंचवार्षिक काळात केलेल्या विविध विकासकामांचा या पत्रातून आढावा घेतला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सुविधा यांसह मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझेशन, आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका, लसीकरण आदी सुविधा पुरविल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

महापालिकेच्या शाळांचे नूतनीकरण करून आधुनिक वर्ग, संगणक व ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी सुरू करण्यात आली. मुळा नदी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, सौरऊर्जायुक्त अत्याधुनिक स्मशानभूमी, शहीद अशोक कामठे उद्यानाचा विकास अशी विविध कामे करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशालनगर व पिंपळे निलख परिसरात सिग्नलमुक्त चौकासाठी अंडरपास, १२ मीटर रस्ते, सब-वे, व्यायामशाळा, आठवडी शेतकरी बाजार, डी.पी. रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा संकल्प…

कोरोना महामारी आणि रखडलेल्या निवडणुकांमुळे विकासाची गती काहीशी मंदावली असली तरी आता पुन्हा नव्या जोमाने काम करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे तुषार कामठे यांनी सांगितले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून, ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे. “मी कायम जनतेच्या सेवेस तत्पर राहिलो असून यापुढेही राहीन. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.

“मी कधीही राजकारणाकडे सत्तेच्या दृष्टीने पाहिले नाही. जनतेची सेवा हीच माझी खरी ओळख आहे. पिंपळे निलख, विशालनगर आणि कसपटेवस्तीचा सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास हेच माझे ध्येय आहे. “मागील कार्यकाळात शब्दांपेक्षा कामांना प्राधान्य दिले. रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि नागरिकांची सुरक्षितता या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने काम केले. पुढील काळातही हाच विश्वास कायम ठेवणार आहे.”
तुषार गजानन कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button