मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार का? रवींद्र धंगेकर म्हणाले,.
![Ravindra Dhangekar said that he will meet MNS President Raj Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/raj-thackeray-and-ravindra-dhangekar-780x470.jpg)
ठाकरे कुटुंब पूर्वीपासून माझ्या जवळचं आहे
पुणे : पुण्यातील बहुचर्चित अश्या कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. कसब्यात भाजपचा परभव झाला तर चिंचवडमध्ये विजय झाला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला.
काँग्रेसकडून लढलेले रवींद्र धंगेकर हे मनसेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. पण, २०१९ साली धंगेकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विजयानंतर रवींद्र धंगेकर राज ठाकरेंनी भेट घेणार का? या प्रश्नाचे त्यांनी उत्तर दिले आहे.
शिवसेनेत असताना दीपक पायगुंडे यांच्यामुळे राज ठाकरेंकडे आकर्षित झालो. १० वर्षे मनसेत नगरसेवक म्हणून काम केलं. पण, २०१९ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरही राज ठाकरेंशी संवाद ठेवला. राज ठाकरेंबद्दल आदर आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या सर्वांच्या हाताखाली काम केलं आहे, असं धंगेकर म्हणाले.
ठाकरे कुटुंब पूर्वीपासून माझ्या जवळचं आहे. आजही राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. शिवसेना आणि मनसे सोडली, पण त्यांच्यावर कधीही टीका केली नाही. कारण, कुटुंब म्हणून त्या परिवारात राहत होतो, असंही रवींद्र धंगेकर म्हणाले.
आमदार झाल्यावर राज ठाकरेंचा फोन आला होता का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, राज ठाकरेंचा फोन आला नाही. पण त्यांना भेटण्यास जाणार आहे.